गुरुपौर्णिमेनिमित्त

  • 261
  • 78

गुरुपौर्णिमा विशेषअवघड ठिकाणी जायला शिक्षकांनी तयार व्हावं?          शिक्षक....... शिक्षकांचा पेशा हाडाचाच असतो. बिचारे शिकवीत असतांना ऊन, पाऊस, वारा, वादळ, हिंस्र श्वापदे या सर्वांची पर्वा करीत नाहीत व आपलं कार्य करीत असतात. एक शिक्षक असाच की जो शिक्षक शिकवायला जात असतांनाच आपला जीव धोक्यात घालून नदी पार करुन जाते. मग त्या नदीला पूर असो की नसो, त्या नदीत हिंस्र प्राणी असो की नसो, त्याला त्याची सवय झालीय. त्या शिक्षकांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तो शिक्षक शाळेत कधी गैरहजर राहिला नसेलच. तशीच एक शिक्षिका. दिव्यांग मुलांना शिकवते. ती शिक्षिका सांगत होती की सर, पाऊस असो की पूर असो, मला