शेती कॉन्ट्रॅक्ट ; शेतकरी आत्महत्येवर उपाय? शेती ही लाभाची की नुकसानाची? असा प्रश्न आज पडायला लागलेला आहे. कारण आजची परिस्थिती तेच दाखवत आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास उन्हाळा केव्हा लागतो, पावसाळा केव्हा असतो व हिवाळा केव्हा येतो. हे कळतच नाही. सर्व दिवस सारखेच असल्यागत आजच्या काळातील दिवसाचे काटे दाखवतात. मात्र पुर्वी असं नव्हतं. पुर्वी पाऊस हा सतत झडी लावून मुक्कामी असायचा, पावसाळ्याचे चार महिने. सतत येणारा पाऊस हा खुणावणारा असायचा सृष्टीला. सतत पूर असायचा नद्यांना व नद्याही दुथडी भरुन वाहात असायच्या पावसाळ्याचे चार महिने. तसं पाहिल्यास पुर्वीच्या काळात शेतकरी सतत पावसात भिजतच असायचा.