जर्मनी अमस्टरडॅमचा निरोप घेऊन जर्मनीत कलोन गावात गेलो. हे ऱ्हाईन नदीच्या तीरावरील सर्वात मोठे गाव आहे .अनेकांचे आवडते परफ्यूम यू डी कलोन याचा उगम इथलाच आहे कलोन याचा अर्थ पवित्र पाणी असा होतो .कोलोन हे बर्लिन , हॅम्बुर्ग आणि म्युनिक नंतर जर्मनीतील चौथे सर्वात मोठे शहर आहे . कोलोन हे शहर ऱ्हाईन नदीच्या दोन्ही बाजूला वसलेले आहे . शहरातील प्रसिद्ध कोलोन कॅथेड्रल हे कोलोनच्या कॅथोलिक आर्चबिशपचे आसन आहे. कोलोन विद्यापीठ हे युरोपमधील सर्वात जुन्या आणि मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे, जिथे सुमारे 50000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या विमानांच्या बॉम्बस्फोटासाठी कॅथेड्रलचे जुळे शिखर हे सहज ओळखता येणारे नेव्हिगेशनल लँडमार्क होते. युद्धादरम्यान कॅथेड्रलला