सुखाच्या शोधात

  • 636
  • 171

              सध्याचा काळ हा मानवाच्या आतापर्यंतच्या उत्क्रांती काळामधील सर्वांत चांगला व सुवर्णकाळ म्हणावा लागेल. कारण असा काळ यापूर्वी नव्हता. भविष्यातही असा समृद्ध काळ राहील असे सांगता येत नाही. आपली आजची पिढी ही सर्व सुख, सोईंनी समृद्ध आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची आधुनिक साधनं उपलब्ध आहेत. मानवाला सुखाने जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या सर्व गोष्टी आज आपल्याकडे उपलब्ध आहेत.             पूर्वीच्या काळी माणसाला राहण्यासाठी घरे नव्हती. आज राहण्यासाठी पक्की व सुरक्षित घरे आहेत. पूर्वी माणसाला अंग झाकण्यासाठी कपडे नव्हते. त्यावेळी थंडी, ऊन, वारा, पाऊस यामुळे माणसांचे किती हाल होत असतील ? आज आपण पुरेसे कपडे परिधान करतो. पूर्वी माणसाला