माझे स्नेही, मार्गदर्शक गणपतराव जगताप (अण्णा) यांचा दिनांक 28.06.2025 वार शनिवार रोजी 75 वा वाढदिवस (अमृत महोत्सव) साजरा झाला. तीन दिवसांपूर्वी कार्यक्रमाचे निमंत्रण अण्णांनी मला दिले होते. शनिवार असल्यामुळे मला सुट्टीच होती. शुक्रवारी रात्री नातेवाईकांसोबत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याचे अचानक ठरले. सकाळी लवकर दर्शन घेऊन शनिवारी रात्री 7.00 वाजता संभाजीनगरला अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी जाता येईल असे मी ठरवले होते. शनिवारी पहाटे 3.00 वाजता आम्ही पंढरपूरला पोहचलो. चंद्रभागेमध्ये स्नान करून पहाटे 4.00 वाजता दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो. भाविकांची खूप गर्दी होती. एका रांगेमध्ये भाविकांची चर्चा चालू होती. एक भाविक दुसऱ्याला दर्शनासाठी दुपारचे 12.00 वाजतील असे सांगत होता. दुपारी 12.00 वाजता