आषाढीच्या स्वादातील भक्ती

  • 501
  • 186

"आषाढीच्या स्वादातली भक्ती"आषाढ मास आला की घरात काहीसं वेगळंच वातावरण यायचं. पंढरपूरचं दर्शन भले नसायचं, पण पंढरपूराचं पावित्र्य आमच्या घराच्या स्वयंपाकघरात दरवळायचं.आषाढी एकादशी म्हणजे आमच्यासाठी उपवास नव्हता, तो "चंगल" होता.आईच्या हातची चव, आजीच्या शब्दांतली भक्ती, आणि संपूर्ण घरात पसरलेला विठोबाचा अनुभव."उद्या कोण उपवास करणार?"आईचा आवाज यायचा, आणि आम्ही भावंडं एकत्र म्हणायचो — "मी!"कोणीही नाही म्हणायचं नाही, कारण उपवास म्हणजे फक्त काही न खाणं नव्हतं — ते म्हणजे काही तरी खास खाणं!आई आणि आजीचं सुरेल युती सुरू व्हायची.भाकर, साबुदाणा, शिंगाडा पीठ, राजगिरा, बटाटे, सैंधव मीठ, रताळी... यादी वाढायची, पण थकवा कधी यायचा नाही.तेव्हा मिक्सर नव्हते, म्हणून भाजलेले शेंगदाणे आई हाताने फिरवून