"दिसत नाही… पण जीवाशी खेळतो!"माणूस आजारी पडतो तेव्हा शरीर आधी काहीतरी संकेत देतं. कधी थोडा ताप येतो, कधी अंग दुखतं, कधी थकवा जाणवतो… मग आपण डॉक्टरकडे जातो. मेडिकल चेकअप करतो. ब्लड टेस्ट, ईसीजी, एक्स-रे… शरीराचं निदान करून आजार शोधतो. आणि योग्य वेळी लक्षात आलं तर बरंही होतो.पण आपण जिथं राहतो, आपलं घर – त्याचं काय? आपलं घर म्हणजे आपल्या कुटुंबाचं शरीर. आणि त्यातही आपण आधुनिक युगात राहतो – प्रत्येक खोलीत विद्युत उपकरणं. गिझर, इंडक्शन, कुलर, मिक्सर, वॉशिंग मशीन… ही सगळी आपल्या सोयीसाठी आहेत, पण त्यांची योग्य देखभाल केली नाही, तर हाच सोयीचा करंट जीवघेणा ठरतो.काल आमच्या घरात असाच एक प्रसंग