नेदरलँड बेल्जियम नंतर आंम्ही निघालो नेदरलँड कडे ..ब्रुसेल्सचा शेजारी असणारा हा देश खुप देखणा आहे .याला हॉलंड पण म्हणतात ट्युलिपचा देश ..विन्सेंट चा देश . सायकलचा देश ...!!नेदरलँड आणि सायकल म्हणजे एकअजोड’ साथ आहे . अगदी फेविकॉल जोड सारखी तशी सायकल चालवायची पद्धत सगळ्याच युरोपीयन देशात आहे . प्रदूषण कमी होतं म्हणून इथं खूपजण सायकल चालवतात . सायकल घालवण्यात कमीपणा मानत नाहीत. चांगली शिकलेली उत्तम पगार असणारी माणसंही सूटबुट घालुन सायकल चालवतात . कार असतात पण कार्समागे सायकली बांधुन , कार्सवरही सायकली रचुन फिरतात . प्रदूषण कमी व्हावं म्हणून सरकार सायकलचा पुरस्कार करतं . महापौर पण सायकलने ऑफिसात जातात. रस्तेही तसेच चकाचक आणि मुलायम आहेत !!नेदरलँड मधली “सायकल फिरवण्यात मग्न पब्लिक