सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 17

  • 339
  • 1
  • 99

  सुरेश दरमहा संकष्टीचा उपास करी. त्याचे बघून बारस्कर पती पत्नी मग त्यांची मुलंहीवसंकष्टीचा उपास धरायला लागले.  शेजारपाजारी घरात मासे मटण केलेलं असलं की सवगवीच्या कुटूंबात द्यायची पद्धत पाळीत असत . मसुऱ्याची  सावतीण माशाची आमटी  घेवून बारस्करणीकडे द्यायला आली. तीने आणलेलं भगुलं  उघडून बघितल्यावर मामी म्हणाली, “ अग्ये बाय माज्ये, म्हावऱ्याचा कालाण?  तसाच ढाकून वापीस घेवन् जा ग्ये बाय . आमचो भाचो इल्या पास्नां आमी  घरात माशे, मटान , म्हावरां रांदूचा बंद केलेला हा. आम्ही खावचाच झाला तर भायर हाटेलात जावन खातंव. तो भट हाना ..... तेका चलाचा नाय.....” त्यावर अजाब करीत सावतीण म्हणाली  “ पन तुमी भंडाऱ्या ना गो ? नी भाचो  भटह्यां