उन्हाळी हापूस आंबा काढणी सुरू झाली की मुंबईला आंबा पेट्या नेणारे व्यापारी सीझनमध्ये आंबा पार्सल न्यायला दस्तुरी नाक्यावरून गुरववाडीपर्यंत ट्रक नेत असत.भाऊनी बांधलेला रस्ता अद्यापी सुस्थितीत होता. सुरेश मॅट्रिक झाला. त्यानंतर रत्नागिरीत संस्कृत पाठशाळेत राहून बी.कॉम. झाला. परीक्षा देवून गावी आल्यावर चार दिवसानी तो रखमाला भेटायला गेला होता. तेव्हा तिचा मुंबई पोलिसमध्ये असलेला भाऊ रामभाऊ बारस्कर आलेला होता. हा घाटेभाऊंचा मुलगा, म्हणून बळीने त्याची ओळख करून दिली. सुरेश रखमाला माहेरच्या नावाने आणि मावशीचं नातं लावून बोलत होता.म्हणून तिचा भाऊ बुचकळ्यात पडलेला होता. तो गेल्यावर त्याने बहिणीला विचारल्यावर तिने घाट्यांशी आपली सवगव कां नी कशी झाली हे सांगितल्यावर तो थक्कच झाला. रखमाने सुरेशला मुंबईत चांगली नोकरी मिळवून