सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 15

  • 198
  • 60

 माजी तक्रात म्हनशा तर  माज्ये   सात भांगे  जातत रस्त्यात..... म्हंज्ये ऱ्हवले फकस्त चार....तेतू पिकनार काय नी आमी खाणार काय? ह्या जमनीर आमच्या कुटंबाचा प्वॉट अवलंबून हा. ए्येक दोन भांगे आसते तर जावने मराने म्हटला आसता. सरकारसगळाच बळकाऊक बगता हा तसा़ कसां जमात? म्हनू माका रस्त्यासाटना जमीन द्येवची नाय........          वकिलानी हरीची बाजू मांडताना आपला अशिल अत्यंत गरीब व अल्प भू धारक आहे, रस्त्यासाठी थोडी झीज सोसायला  तयार आहे. पण निम्मेपेक्षा जास्त क्षेत्र ऍक्विझिशन खाली यत आहे. ही जमीन रस्त्याखाली गेली तर त्याच्यासह कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ येणारआहे. तेव्हा एकतर ऍक्विझिशन एवढी पर्यायी शेतजमीन सरकारने द्यावी कि़वा फेर सर्व्हे