भाग १५. "हे बघ कविता, ती दिसायला चांगली असली तरीही खानदानी नाही आहे. मला अशी मुलगी माझ्या घरात नको आहे. जर युवराजने स्वतः हून सांगितले तरच मी तिला आपल मानेनं. कशा वरून ती मुलगी फसवत नाही?",आजी युवराजच्या आईसोबत बोलत असते. "आई, अहो तिने तर सगळ काही सांगितले आहे आणि तिच्याकडे एवढं असताना ती का असे वागेल बर?",कविता(युवराजची आई) विचारते."आईवडील नाही आहे तिला आणि बहिणीचे सगळ बाकी आहे तर त्यासाठी देखील ती अशी वागू शकते. मला काय त्या पोरीवर विश्वास नाही आहे. ते एवढं मोठ मंगळसूत्र घालून फिरत आहे ते मागून घे तिच्याकडून. काय माहित ते विकून ही येऊ शकते. माझ्या नातवाने