टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग १४

  • 348
  • 108

भाग १४.      युवराजच्या आजीचे बोलणे अंतरा ने ऐकले होते. जे ऐकून तिला राग येत होता. आजवर तिच्या बहिणीला अजून पर्यंत कोणी असे बोलले नव्हते. त्या आजीच्या मते, गायत्री एक फसवणारी मुलगी आहे! हेच तिला जास्त लागले होते. त्यावर ही गायत्रीची थंड प्रतिक्रिया होती. जे पाहून तिचा राग वाढला होता. गायत्री एकटीच रूम मध्ये आपल्या असते. त्याच वेळी अंतरा तिथं येते. टेडी असतो हे तिला माहीत नव्हते. "दीदी, तुला त्या आजीला उत्तर देता येत नव्हते का? मी म्हणते अश्या लोकांना तर सत्य सांगून टाकायला हवे होते. तुमचीच प्रॉपर्टी वाचवण्यासाठी हे सगळ करावे लागले होते. हौस नव्हती आम्हाला, असे वागायची.", अंतरा