भाग १३. आज जसे काम त्या चौघांनी ठरवले होते. तसे ते काम करायला आज तयार झाले होते. हॉस्पिटल मध्ये मात्र युवराजची फॅमिली युवराजला त्याच्या रूम मध्ये नाही पाहून खूपच राग व्यक्त करत असते. शेवटी, एक नर्स त्यांना गायत्रीचा पत्ता देते. तसे त्याच्या घरचे गायत्रीच्या घरी जायला निघत असतात. पण त्या आधीच निखिल तिथं येतो. हॉस्पिटल मध्ये झालेला प्रकार पायलने गायत्रीच्या कानावर टाकला होता. त्यामुळे गायत्री निखिलला हॉस्पिटल मध्ये पाठवते."काका, काकी जरा शांत रहा!",निखिल त्यांच्याजवळ येत म्हणाला. "निखिल, अरे माझ्या युवराजला ती डॉक्टर घेऊन गेली आहे. ते ही न सांगता. तू म्हणतो आहेस, शांत रहा! कस राहू?", युवराजची आई