टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग १२

भाग १२."कोण आहात तुम्ही?", टेडीला हिंमत करत निखिल विचारतो."बॉसला विचारतो कोण तुम्ही?",टेडी ही रागात विचारतो."आता त्याला माहीत आहे का मिस्टर टेडी तू त्याचा बॉस आहे म्हणून?",गायत्री याच काहीच होऊ शकत नाही या आविर्भावात त्याला विचारते. तसा तो गायत्रीला पाहू लागतो."डॉक्टर, मग तो बघ कसा प्रश्न करत आहे? मला ना बिलकुल अस आवडत नाही! मी माझ्या शरीरात असलो असतो, तर हा इथ उभा नसता राहिला.", टेडी थोडासा वैतागत म्हणाला. "शांत टेडी! शांत!",गायत्री त्याला हात दाखवत रिलॅक्स करत म्हणाली. "ओके.",अस बोलून तो शांत होतो. गायत्री मग निखिल आणि अंतराला पाहते. त्यांचे घाबरलेले चेहरे पाहून गायत्री समजून जाते."टेडी असा बोलत आहे हे पाहून भीती वाटत