भाग ११. अंतरा एका ठिकाणी गाडी पार्क करते. ती गाडीच्या बाहेर पडत गाडी लॉक करून चालतच एका रो बंगलो जवळ जाते. ती आपला मोबाईल काढून अड्रेस आणि त्या बंगल्या बाहेर दारावर लटकवलेली नेम प्लेट चेक करत असते. खात्री पटल्यावर ती त्या बंगल्याची बेल वाजवते. बेल वाजताच एक व्यक्ती दरवाजा उघडून तिला पाहतो."निखिल जोशी तुम्हीच का?",अंतरा त्याच्या कडे पाहत विचारते. चांगला चोवीस, पंचवीस वर्षाचा तो तरुण होता. "हो.",तो गोंधळून बोलतो. पुढे असणाऱ्या अनोळखी मुलीला त्याच नाव कसे माहीत झाले? हा प्रश्न त्याला पडला होता."युवराज पाटील यांचे असिस्टंट आहात ना तुम्ही? त्यांच्या कडून मी आले आहे. तुम्ही माझ्यासोबत सध्या चला. एक