युरोपियन हायलाईट - भाग 3

  • 276
  • 90

चॉकलेटचे शहर बेल्जियम ..पॅरिस मधुन बाहेर पडल्यावर आमचे पुढचे ठिकाण होते बेल्जियम.बेल्जियम हा फेमस चित्रकार रेने माग्रिटेचा  देश.येथेच हुशार डिटेक्टीव टिनटिन होऊन गेला. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या सर्वापेक्षा बेल्जियम लहान आहे बेल्जियमची जागा मध्यवर्ती असल्याने  सगळे लोकं भांडायला मध्यवर्ती पडते म्हणून इथं येत असतBattlefield of Europe म्हणून बेल्जियमची ओळख आहे नेपोलिअन जिथे लढाई हरला ते वाटर्लु इथलंच. अनेक वर्षानंतर बेल्जियम आता प्रगती करतेय .ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी. ब्रुसेल्स फार छान टुमदार शहर आहे. गजबजलेल्या  फॅशनेबल पॅरिसमधून या ब्रुसेल्स गावात आल्यावर फार छान आणि शांत वाटते  आमच्या जेवणाच्या हॉटेलच्या आसपास सुंदर रेसिडेन्शिअल बंगलो असलेली कॉलनी होती.  वीकएंड असल्याने सुट्टीचा दिवस  होता आणि लखलखीत सुर्य असल्याने लोकं