युरोपियन हायलाईट - भाग 2

  • 315
  • 105

पॅरिसपॅरिस हिंदी आणि इंग्रजी सिनेमातून अनेकदा पाहिलं होतं आणि अर्थातच आवडलं होतं. एमिली मिडनाईट इन पॅरीस ,आणि  काही आंतरराष्ट्रीय सिनेमातून पॅरिसचे दर्शन होते चित्रकार , चित्रे याविषयी वाचता लिहिताना पॅरीसचा उल्लेख सतत येतंच असतो शम्मीचा एन इव्हिनिंग इन पॅरिस तर हा तर अनेक  वेळा पाहिलेला आणि मनावर मोहिनी पडलेला चित्रपट .त्यामुळे उत्सुकता होतीच .. लंडनच्या सेंट पँक्रा स्टेशनवर सोपस्कार पार पाडून युरोस्टारची वाट बघत बसलो. इथलं वायफाय खुप छान आहे त्यामुळे वाट पाहताना बरेच लोक  मोबाईल मध्येच गर्क होते.आमच्या बरोबरच्या दोन मैत्रीणी नुकत्याच घेतलेल्या मोबाईल सेटिंग मध्ये गुंतलेल्या होत्या हे स्टेशन तर सुंदर आहेच पण बसण्याची व्यवस्था बऱ्याच खुर्च्या असुन सुद्धा सततच्या गर्दीमुळे अत्यंत अपुरी वाटते