स्वयंपाक घरात उगवलेला पुरुष

  • 531
  • 183

"स्वयंपाकघरात उगवलेला पुरुष"(एका पोळीच्या तव्यावरून निघालेली माणूसपणाची गोष्ट)"काय रे, काय बायकांसारखं स्वयंपाक शिकतोयस?"दिपकचा आवाज खोलीत घुमला. त्याच्या हसण्यात थोडासा उपहास, थोडीशी गंमत आणि थोडासा तो पुरुषी अहंकार मिसळलेला होता.गॅससमोर आदित्य उभा होता. निळ्या रंगाचा एप्रन त्याच्या अंगावर थोडासा विसंगत वाटत होता, किमान दिपकला तरी. आदित्यने हातातल्या बेलननं पोळी लाटत ठेवली होती. त्याच्या कपाळावर घामाची रेषा चमकत होती, आणि त्याचे डोळे पोळी फुगतेय का हे पाहण्यात गुंतले होते."बायकांसारखं नाही रे… माणसासारखं शिकतोय,"आदित्यचं उत्तर शांत, पण ठाम होतं.दिपक काही क्षण गप्प झाला, मग खुर्चीत बसत म्हणाला,"अरे पण तुझ्याकडे आई आहे, बायको आहे. तुला कशाला गरज? आपल्याला काय करायचंय हे सगळं?"आदित्यने पोळी तव्यावरून