कृतांत भाग३ षटकोनी आकाराच्या या मैदानात एक पन्नास वर्षांचा प्रौढ इसम गुडघ्यांवर बसून रडत रडत दयेची भीक मागत होता.सभोवार असंख्य लोक बसले होते. मैदानाच्या पूर्वेकडच्या सज्जात एक अत्याधिक सुंदर युवती बसली होती. सौंदर्यांची व्याखा तिला बघूनच सुचली असावी एवढी ती सुंदर होती.ती सुंदरी दुसरी तिसरी कुणी नसून ती अचलापूरची राजकन्या गौरी वर्मन होती.ती जेवढी सुंदर होती तेवढीच ती क्रूर व निर्दयी होती.सारी प्रजा तिचं नाव ऐकलं तरी थरथर कापायची. कोणाला कोणत्याही कारणांसाठी ती अमानुष शिक्षा करायची. तिच्यासाठी तो एक खेळ होता. एखादी व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत बघणे तिला आवडायचं.अश्यावेळी ती खदाखदा हसायची.आत्ता जी व्यक्ती