टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग १०

भाग १०.      गायत्री निखिल सोबत कस बोलायचे? याची तयारी करत असते आणि टेडी तिला तयार करत असतो. त्यांचे चालू असते, त्याच वेळी गायत्री वर अननोन नंबर वरून कॉल येत असतो. गायत्री त्या कडे इग्नोर करते आधी. नंतर पुन्हा पुन्हा येतो. तसा टेडी हात मारत उचलतो. पण त्याच्या त्या स्किन मुळे मोबाईल काही उचलला जात नाही. गायत्री मग स्वतः कडे घेत कॉल रिसिव्ह करून स्पीकर बर टाकते."हॅलो, गायत्री देशमुख.",पलीकडून आवाज येतो. टेडी तो आवाज ऐकून मोबाईलला पाहू लागतो. "हॅलो, काही काम असेल? तर आज जमणार नाही!",गायत्री अस बोलून कॉल कट करायला जाते. "ही चूक करू नको डॉक्टर. तुझी बहिण घरी एकटी