भाग ९."ते ज्वेलरी शॉप कुठे आहे?",एका ठिकाणी आपली कार पार्क करत ती टेडीला विचारते."इथून एक मिनिटांवर आहे. आपण चालत जाऊ. पण डॉक्टर तुझ्याकडे प्रुफ काहीतरी असल पाहिजे म्हणजे बायको आहेस याच?", टेडी आपल्या कपाळाला हात लावत बोलून विचार करतो."तुला जर माझी आयडिया पटत असेल तर बघ.",गायत्री बोलते. "सांग तर आधी आयडिया.",टेडी सीट ब्लेट काढण्याचा प्रयत्न करत म्हणाला."तुझे संवाद असतील माझ्याकडे तर ते आपल्या विश्वास ठेवतील. थांब आपण व्हॉट्सॲप द्वारे पाहू. मी तुझं एक अकाऊंट बनवते. तिथं नाव युवी(हबी) असे टाकते. तुझ्या अकाऊंट ने मला मेसेज करते. मी च उत्तर देते. मग आपले संवाद त्यांना दाखवून दागिने मिळू शकतात. ड्यूअल सिस्टिम वापरू!",गायत्री