भाग ८."डॉक्टर, मला अस एक साईड झोपायला मदत कर.",टेडी वैतागत म्हणाला. आता ते दोघे आपल्या आपल्या जागेवर झोपत होते. गायत्री सोफ्यावर होती आणि तो बेडवर. शरीर मोठ होत म्हणून बेडवर झोपत असायचा तो. आता पोट मोठ असल्याने, त्याला एक साईड अस झोपायला येत नव्हत. खूप प्रयत्न करून ही त्याला जमत नव्हते. जेव्हा जेव्हा तो हातावर झोपायचा प्रयत्न करत असायचा तेव्हा तेव्हा तो पुन्हा पाठीवर बेडवर पडत असायचा. त्याची कृती पाहून गायत्रीला हसू येत होत. "तू तसा झोपूच शकत नाही. तर तो विषय सोड आणि गप्प पडून रहा बघू.",गायत्री आपल हसू दाबत म्हणाली."का झोपू शकत नाही? हा हे गोल मोटुल पोट मुळे