टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ७

  • 588
  • 234

भाग ७.      एका हॉटेल मध्ये गायत्री आपल्या टेडी सोबत एका प्रायव्हेट एरियात बसली होती. तिथं श्रीमंत लोक डिनरसाठी बसत असायचे. गायत्री मेन्यू कार्ड वाचत असते. टेडी तिथं असलेल्या समोरच्या फुलदाणी सोबत खेळत असतो. त्यातील फुल हातात घेत गायत्रीच्या जवळ जाऊन द्यायचा प्रयत्न करायचा. ती घ्यायला गेली फुल की लगेच मागे करत असायचा. ती ही काही त्याला बोलत नव्हती. तिथं बसल्याने ते दोघे कोणाला ही दिसत नव्हते. "डॉक्टर, ते श्री. कधी येणार आहेत? बघ कॉल वगैरे करून. मला पण ऐकायचं आहे त्यांच्याकडून मी पुन्हा माझ्या शरीरात जाऊ शकेल का नाही?", टेडी टेबल वर असलेला फोन तिच्या जवळ सरकवत म्हणाला. "येणार आहे