भाग ५. टेडी शांत बसून समोर पाहत असतो. आता तिथं तो एकटाच होता आणि त्याच शरीर होत. तिथं बसून त्याला कंटाळा येत होता. त्याच वेळात एक सुंदर अशी तरुणी चालतच दरवाजा उघडून आत मध्ये येते. त्या सुंदर मुलीला पाहून टेडीचे डोळे चमकतात. "सुशीला.",हेच नाव तो मनात बोलतो. तिने ऐकू नये यासाठी. ती तशीच चालत येत समोर निपचित पडलेल्या त्याच्या शरीराला पाहत असते. डोळ्यांत पाणी होते सध्या तिच्या. आसपास ती नजर फिरवते तर तिथं कोणीच तिला दिसत नाही. तसे ती टेबलवर बसत एक हात डोळ्यावर स्वतःच्या फिरवत पाणी आपले पुसून टाकते."युवी, बेबी सॉरी. तुझी अवस्था पाहून मला वाईट नाही वाटत आहे.",सुशीला