टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ४

  • 369
  • 165

भाग ४."डॉक्टरऽऽऽ डॉक्टरऽऽऽ",असा आवाज तिच्या कानावर पडतो. हा आवाज कोणाचा होता हे तिला ओळखायला वेळ लागला नाही. बाहेर थांबलेली ती रूमच्या आत निघून येते. पाहते तर टेडी बरा भिजला होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड इरिटेड भाव दिसत होते. त्याला अस पाहून तिला हसूच येत. "तुला कळत नाही का तू एक टेडी आहेस?",हसू आपल दाबत गायत्री त्याला विचारते. आता त्याला आठवत तसा तो नाही मध्ये मान हलवतो. "मला सकाळी अंघोळ करायची सवय आहे. पण आता हे अस झाल आहे. कस सुकेल हे? वाटत नाही!",आपल्या अंगाकडे पाहत तो विचारतो. भिजला होता तो. बाथरूम मध्ये जाऊन शॉवर चालू करताच पाणी त्याच्या अंगावर पडले होते. थोड पाणी