टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग ३

  • 543
  • 189

भाग ३."ओम भगा भुगे भगनी भगोदरी ब्रम्हासे क्लीमना क्लीमना ओम भट स्वाहा!", तिच्या छातीवर हात ठेवत कोणीतरी बोलत असते. आवाज ही विचित्र होता. असे हात ठेवल्याने भीतीने तिचा थरकाप होत होता. हळूच धीर करून आपले डोळे ती उघडते आणि पाहते. तर समोर तिचा टेडी बसलेला होता. त्याचे हात तिच्या छातीवर होते. तो मंत्र बोलत असतो. आता त्याचा आवाज खूप कर्कश वाटत होता. तिला तर सगळ पाहून खूपच भीती वाटत असते."काय....काय ....करत आहेस तू?",ती कसेबसे भीतीने एक एक शब्द जुळवत विचारते."थांब! मला माझं काम करू दे! हा मंत्र म्हटला की माझा आत्मा तुझ्यात , तुझा आत्मा बाहेर!",टेडी अगदी तात्या विंचू सारखे