अनुराग प्रिन्सी बद्दल जे घडलं आहे हे अगदी थोडक्यात ऐकूनच भारावून गेला होता . तो उठून त्याच्या बेडरूम मध्ये निघून जातो . तिथे आर्या झोपली असते . तिच्या जवळ जाऊन तो तिच्या पायांची पप्पी घेतो . त्याच्या डोक्यामध्ये विचारांचा गुंता चालू असतो . तितक्यात तो आर्या जवळ जाऊन तिच्या बाजूला पडतो . लाइट्स ही बंद करून घेतो . श्वेता थोड्या वेळातच बेडरूम मध्ये येते. लाइट्स बंद आहेत हे बघितल्यानंतर ती विचार करते अनुराग इतक्या लवकर कसा झोपला ? नंतर स्वतःच म्हणते, '' ठीके आज थकला असेल ! "श्वेता झोपण्यासाठी पुढे जाते तितक्यात तिला अनुराग हालचाल करताना दिसतो . ती