सावलीने फोन हातात घेतला आणि तो मेसेज रीसीव केला. त्यानंतर तीने तो मेसेज वाचला, त्यात एका ठिकाणचा पत्ता लिहिला होता आणि सायंकाळी सात वाजता तीला भेटण्यास बोलावले होते त्या पत्त्यावर. सावलीने तो मेसेज फोनमध्ये सेव केला आणि ती घराचा दिशेने निघाली होती. घराकडे जात असतांना तीला अचानक कालचा प्रसंग आठवला कशी कोमल आणि तीची आई तीचा बरोबर वागली बोलली. त्यामुळे तीचे मन फार दुखी झाले होते. त्याच बरोबर तीचे घराकडे जाणारे पाऊल आता मागे मागे खेचू लागले होते. तेवढ्यात तीने घडी बघीतली तर घडीत दुपारचे १ वाजले होते. मग सावलीने विचार केला आणि ती स्वतःशी बोलली, “ माझे मन तर