सराई सुरू झाली. पाऊस उडाला नी गवतं सुकली. कलमा़ंच्या तळ्या करुन दक्षिण धरून प्रत्येक कलमाला उन्हाचा चटका बसू नये म्हणून आंजणीचे टाळ बांधून शि़पण़ं सुरू झाल. गेल्या सिझनला भाऊ आणि:गंगावहिनीने आपल्या डोक्यावरून डबे वाहीले. यंदा दैन्य फिटलं, चार पैसे हातात आले. धकल्या नी त्याचा भाऊ याना शिपणं देऊन भाऊ बिनघोर झाले. दिवाळी पूर्वी काठ्यांचा पूर्ण हिशोब शामरावाने गोडावून कीपरकडे देऊन ठेवला. त्याने दादा खोतांमार्फत रक्कम पाठवली. दादा़ंचा भेटून जा असा निरोप आला म्हणून भाऊ गेले. ते गेल्यावर दादानी व्यापाऱ्याचं पत्र आणि रक्कम समोर टाकली…... भाऊ चाटच झाले.घरी गेल्यावर त्यानी रखमाचे पैसे बाजूला काढले. ते स्वत: जाऊन रखमाशी बोलू शकतनव्हते. काशी