मागे तुमच्ये सामनी तेका दनको दिलो हुतो तवा पासून माज्या सामनी तो तुमची वार्ता काडीत नाय पन तेनाच डूक धरून तुमका धडो शिकव साटी ही कारस्थानां चलवलेली हत..... तेका शेजाऱ्याच्यो कोंबड्यो कणयो घालून झुजवूची वायट् खोड हा…… तुमच्ये बदली हेरी कोन आसतो तर खचोने.... म्हनून मी गप बसल आसतय.... तेच्या येवारात मी कदीच लक्ष घतलेलो नाय. पन बीन कारनी तुमच्या सारक्या देवमानसाक तरास देना बरोबर नाय. माजो बापूस तानू बारस्कर म्हंजे कर्दनकाळ हुतो.... पन भट माणूस समोर ईल्यावर रस्त्यात दुकू तो तेच्या पायार डोकां ठेवी....आमका तेची शिकवणी हुती काय भटाची जात ही गोडी.... आपून तेंच्या पाया पडॉन दुवो