अनुबंध बंधनाचे. - भाग 45

  • 855
  • 294

अनुबंध बंधनाचे.....( भाग ४५ )       दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून प्रेम ऑफिसला जायला निघतो. वाटेत तो त्या बस स्टॉप वर थांबतो. दोन तीन बस निघुन जातात. पण एकाही बसमध्ये वैष्णवी नव्हती. ऑफिसची वेळ तर झाली होती. तरीही ती आली नव्हती. याचा अर्थ ती आज येणार नाही, असं समजून तो तिथून ऑफिस मधे येतो. तो आत जाऊन पाहतो तर तिथेही ती नसते. तिला कॉन्टॅक्ट पण करू शकत नव्हता. कारण तिच्याकडे मोबाईल तर नव्हताच पण घरचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तिने कधी दिला नव्हता. "कालच्या सर्व प्रकारामुळे आज ती आली नाही...! तिने जॉब तर सोडला नाही ना...?" असा विचार त्याच्या डोक्यात येत होता. त्याला आता अजुन