फुलं

  • 366
  • 129

गुरुवारची सकाळ होती.नेहमी प्रमाणे घरात सकाळच्या कामाची घाई होती, पण आजीच्या मनात एकच खंत होती — “अरे, फुलं विसरले! आज गणपतीला मीच.. विसरले? ” कारण मंगळवार आणि गुरुवार आजीचं उपवास. त्यामुळे हे दोन दिवस आजीला फुल हवीच असतात. आणि काल ते विसरून गेले फुले मागवायचं.. “प्रणव... काल फुलं नाही आणलीस का?”सारी तयारी झाली होती — गंध, अक्षता, समई, पणती... सगळं ठिकाणी. पण देवमूर्तीसमोर फुलं नव्हती.प्रणव फ्रिजकडे वळला, "पाहतो गं आई, कदाचित कालचं काही फुलं शिल्लक असेल."दरम्यान, आजीच्या शेजारी बसलेला नातू विहान टक लावून सगळं बघत होता. फुलं नसल्याने आजीच्या चेहऱ्यावर जे क्षणभर उमटलेलं दु:ख त्याच्या लक्षात आलं.आजीचा चिंतीत चेहरा.तो सहजच म्हणाला,“आजी… देवाला