आम्हाला गरीब नका म्हणू हो

  • 282
  • 84

आम्हाला गरीब नका म्हणू हो           *आम्हाला गरीब म्हणू नका. आम्हाला ते चिडवणं झालं. एका गरीब माणसाची व्यथा. आपण सतत म्हणत असतो की अमुक अमुक व्यक्ती हा गरीब आहे. हे आपलं गरीब म्हणणं म्हणजे ही एक गरीब माणसांची केलेली टिंगल असते. तसं पाहिल्यास गरीब व्रक्ती हा काही गरीब नसतोच. तो एवढा श्रीमंत असतो की त्याच्या घरी आनंद असतो. इज्जत, अब्रू, मान, पान सन्मान असतं. त्याच्या घरी कोणी गेल्यास त्याच्या घरची मंडळी ही मान करीत असतात. तो भ्रष्टाचार करीत नाही व अतिशय इमानदारीनं, चालतो वागतो. अशा गरिबांच्या घरातून संकटं कितीतरी दूर पळालेली असतात. आजार तर बिचाऱ्यांना शिवत नाहीत.