विद्यार्थी घडविण्यासाठी?

  • 447
  • 126

विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा?           *विद्यार्थी शिकविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. म्हटलं जातं की विद्यार्थी ज्ञानसागरातील मासा आहे. परंतु जिथं ज्ञानाचं पाणीच नाही. तिथं हा मासा तली कसा जीवंत राहू शकेल? कारण त्याला जीवंत ठेवण्यासाठी लागतं, त्याला दर्जेदार शिकविणं, त्याला भौतिक सुविधा पुरवणं. ज्यातून त्याच्या ज्ञानाच्या कक्षा वाढू शकतात. शिकविण्याचं काम शिक्षक करतो व भौतिक सुविधा शाळेचा संस्थाचालक. शिवाय हू दोन्ही घटक आपआपली कामं बरोबर करतातही. परंतु हे जरी बरोबर असलं तरी आजच्या काळात शिक्षण क्षेत्राने केवळ पैसे कमविणे हा उद्देश ठेवलेला असून आजचे काही शिक्षक बरोबर शिकवीत नाहीत. तसेच आजचे काही संस्थाचालक शाळेत बरोबर सुविधा करीत नाहीत.