शिक्षण सर्वांसाठी उपयोगाचं? शिक्षण ही गोष्ट सर्वांसाठी उपयोगाचं आहे. जर शिक्षण नसेल यर त्या व्यक्तीची अवस्था ही एखाद्या प्राण्यागत असते. प्राण्यांना बोलता येतं. चालता येतं. काबाडकष्टाची कामं करता येतात. सांगकाम्या प्रकाराची स्थिती त्यांची होवून जाते. अन् एवढं सगळं करुन देखील पळसाला पानं तीनच असल्यागत त्यांची अवस्था होवून बसते. माणूस नावाचा हा प्राणी इतर प्राण्यांवरच अत्याचार करीत असतात. त्यांना गुलामासारखं वागवत असतात. त्यांच्याकडून कष्टाची कामं करुन घेतात. बदल्यात साधं पोटभर अन्नही मिळत नाहीत. परंतु तरीही ते कामाच्या बाबतीत इमानदार असतात. कारण त्यांना शिक्षण नसल्यानं ते गुलाम असतात. ते आपल्यावर होणाऱ्या अत्याचारावर दादही मागू शकत नाहीत. ती दाद त्यांना