शिक्षण सर्वांनाच उपयोगाचं? शिक्षण सर्वांनाच मिळायला हवे. मग ती स्री असो, पुरुष असो वा एखादा अस्पृश्य असो, आदिवासी असो वा एखादा आंधळा असो, अपंग असो, लहान असो, वयोवृद्ध असो. शिक्षणासमोर, शिक्षण घेतांना सर्व समान असतात. त्यानुसार शिक्षण ही प्रक्रिया सर्व समावेशक आहे व त्यात लिंगभेद नाहीच. शिक्षणाचे दोन प्रकार आहेत. औपचारिक शिक्षण व अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण म्हणजे रितसर घेतलेले शिक्षण. जे रितसर प्रवेश घेवून शाळेत मिळत असतं आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे शिक्षण शाळेत न जाताही मिळते. जसे थॉमस अल्वा एडीसन व मायकेल फॅरेडे व लुई पाश्चरला मिळाले. ते शाळेत न