आपलं नेतृत्व सक्षम असावं?

  • 630
  • 174

आपलं नेतृत्व सक्षम असावं?            नेतृत्वाला शालेय दृष्टीकोनातून जास्त महत्व आहे. नेतृत्व नसेल तर शाळा चालवणे कठीण होवून जातं. नेतृत्व ही संकल्पना व्यापक व मूलगामी आहे. समुहाचा नेता जेवढा चाःगला. तेवढा समूह अधिक बळकट होतो. यादृष्टीनं नेतृत्वाचं महत्व आहे.           नेतृत्वाबद्दल सांगायचं झाल्यास नेतृत्व करणारा व्यक्ती काय करतो? तर याचं उत्तर आहे, नेतृत्व करणारा व्यक्ती हा दिशा दाखवतो व आपल्या विचारानं प्रभावीत करतो. कधीकधी त्याला जास्त काम करण्याची गरज नसतेच. तो फक्त मार्गदर्शन करतो. त्यानुसार दिशा ठरत असतात. जर नेताच डामडौल स्वरुपाचा असेल, तर दिशा कळत नाहीत. आपण ऐकलं असेल पुर्वीच्या युद्ध कहाण्या.