..अंजना ला प्रथम भेटले ते बँकेच्या एका शैक्षणिक कोर्समध्ये मला भेटल्या क्षणी आवडली ती अंजना ...आणी ती तर माझ्या प्रेमातच पडली जणु !!!एका क्षणात भरपूर बडबड करू लागली अंजना ..जणू काही आमची जुनी ओळख आहे .वय पंचवीस् च्या आसपास ..साधारण उंची मध्यम बांधा ..सावळा रंग चेहेर्यावर एक आत्मविश्वास !!आणी सगळ्यात विशेष डोळ्यात भरणारे तीचे मोठ्ठे मोठ्ठे काजळ भरले डोळे उत्तराखंड ची असणारी अंजना हिंदी भाषिक होती आम्ही ट्रेनिंग सेंटर च्या होस्टेल ला एकत्र एका खोलीत रहाणार होतो एक आठवडा भर मुक्काम असणार होता आमचा उत्तराखंड ची असणारी अंजना काम मात्र मध्य प्रदेशच्या बँकेच्य शाखेत काम करीत होती पहिल्या भेटीत आम्ही दोघी इतक्या गप्पा मारीत बसलो की जेवणाची वेळ कधी