मुंगी: सूक्ष्म शिकवण"रोजच्या घरातल्या गडबडीत,ओट्यावर एकच गोष्ट वारंवार घडत होती…लाल मुंग्यांचा "दौरा!" कधी ओट्यावरून, कधी साखरेच्या डब्यात. तर कधी,कपड्यांच्या दोरीवर. एखादे कणकेच्या डब्यात..कधी डायरेक्ट भिंतीवरून सरसर चढणाऱ्या लाल मुंग्या,ज्यांना बघितलं की, आपली पहिलीच प्रतिक्रिया असते –"उफ्फ… स्प्रे आणा! यांचं काहीतरी करा!" जणू घरात मुंग्या नाही आल्या आतंकवादी आले. अशीच प्रतिक्रिया असते ना आपल्या माणसांची.त्या दिवशी मी सुद्धा असंच म्हणाले. हिट स्प्रे मारा, तर कधी मुंग्या मारायची पावडर. लक्ष्मण रेखा..सगळं झाडून घातलं, आणि त्या लहानशा जीवांची वाटच लावली. आणि त्या नंतर आपोआप गायब झाल्या..रात्र झाली.स्वयंपाकघर स्वच्छ होतं, पण…मन कुठंतरी चिवचिवत होतं.माझ्या डोळ्यासमोर त्या लाल मुंग्यांची रांग फिरत होती.एकीने चटकन साखरेचा कण उचललेला,दुसऱ्या पाठी