७ हा पाचवा पती होता की त्या पतीनं तिला फिरायला नेलं होतं. तो गोव्याचा समुद्र तिला हुलकावणी देत होता. तशी त्यानं तिलाही हुवकावणी दिली होती. तिला काय माहीत होतं की तो पती गोव्याला नेवून तिला सोडून देईल. अगदी तसंच घडलं होतं. त्यानं सांगितलं होतं की तो दुकानातून येतोय. तो दुकानात गेला व गायब झाला होता. आपण फिरायला जातो. कारण आपल्याला फिरणे आवडते. निसर्ग पाहाणं आवडतं. किल्ले व प्रेक्षणीय स्थळं पाहाणं आवडतं. जंगल, वनसंपदा व प्राणी पाहाणं आवडतं. विचित्र वस्तू, व्यक्ती पाहाणं आवडतं. धार्मिक स्थळं पाहाणं