भ्रमंती सिंधुदुर्गाची - 4

  • 261
  • 96

सफर सिंधुदुर्गाची ४देवाचं गाव - देवगड (२८ एप्रिल २०२५)तसे आम्ही फिरस्ते. पावलांना ओढ...रस्ते तुडवण्याची...नजरेला भूक निसर्ग न्याहळण्याची. आम्हाला मग वेळ....काळ याच बंधन नसतं.झांट्ये...गोडकर...,केरकर व मी असे चारजण फिरायला बाहेर पडलो.नेहमीप्रमाणे ठिकाण ठरलेलं नव्हते.गाडीच सुकाणू झांट्येच्या हाती होतं.गाडी कुडाळ उद्यमनगरातून... पाट येथे उजव्या बाजूला वळली.पाट तलाव में महिन्यातही पाणी व पाणवनस्पतींनी भरलेला होता.काही बगळे पाण्यात ध्यानस्थ उभे होते. हिवाळ्यात येथे विविध स्थलांतरीत पक्षी येतात.आम्ही सागरी महामार्गावरुन परूळे व मधली गाव पार करत चिपी विमानतळाजवळ पोहोचलो.बाहेर सूर्य आग ओकत होता.मधला रस्ता हा दोन्ही बाजूंच्या माड पोफळीच्या भागांनी भरलेला होता.पण चिपीच्या अलिकडून कातळ सुरु झालं. हिरवाई कमी झाली.उदास सुना व उजाड असा विमानतळाचा