ती काळी होती… पण मनाने उजळ”

  • 267
  • 87

“ती काळी होती… पण मनाने उजळ”---दृश्य १: (संध्याकाळचं वेळ, गच्चीत वाऱ्यावर हलणारी साडी, आणि संवादाची सुरुवात)"अगं पाहिलंस का ती? आपल्या सोसायटीत नव्याने रहायला आली आहे… त्याची बायको किती काळी आहे गं!"स्नेहा चहाचा कप हातात घेत आपल्या पती सुजयला म्हणाली. तिच्या आवाजात हिणवण्याचा सुर होता.सुजय थोडा वेळ गप्प राहिला… मग हळूच म्हणाला,"हो, काळी आहे… पण तिचं हसणं पाहिलंस का? आणि ती ज्या प्रकारे आपल्या नवऱ्याची काळजी घेते, ते बघितलंयस का?"स्नेहा थोडीशी थबकली. सुजयचा चेहरा गंभीर होता.---दृश्य २: (भूतकाळाचा फ्लॅशबॅक – ती नवविवाहित काळी स्त्री – अनामिका)अनामिका. काळा वर्ण, पण मनाने सोनं. गावी मोठ्या संघर्षातून आलेली. लग्न झाल्यावर शहरात या नव्या घरात