*ई साहित्याचा वापर अभ्यासक्रमात व्हावा?* *शिक्षकांनी शिकणं गरजेचं आहे. तो जर शिकला तर तो वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवेल. त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवेल. त्यांना सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचवेल. तो विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करायला लावेल. विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक, भौगोलिक व इतर प्रकारचा सर्वांगीण विकास साधेल. ज्याचा परिणाम संशोधक वा इतर प्रकारचे व्यक्ती बनण्यात होईल व आपोआपच देशाला जागतिक महासत्तेची अवस्था प्राप्त होईल. देशाला विश्वगुरुही बनवता येईल. शिक्षकांनी शिकावं. त्यासाठी त्याला सहजपणे साहित्य उपलब्ध व्हावं. यासाठी सध्या ई लर्निग सुविधा आलेली आहे. ज्यात एका क्लीकवर जगाच्या कोणत्याही कोपर्यातून कोणालाही साहित्य प्राप्त करुन घेता येते. त्याचा वापर शिक्षकांनी करावा. विद्यार्थ्यांनाही करायला लावावा.