AUTHOR: jayesh zomate...निशाचर भाग 3धवल एकटक पुढे जे काही घडत आहे - ते चोरुन पाहत होता. आणी पुढे आता जे काही घडत गेल , विळक्षण मतीबधीर करणा-यांमधल होत. तो लाल रंगाचा जब्बा घातलेला मानवी आकार त्याने आपले दोन्ही हात वर केले , व मानवी , घोग-या , खर्जातल्या तीन मिश्रिंत आवाजांत बोलू लागला. " हे महामहिम अंधकारराज , दरवर्षीप्रमाणे आजही मी तुम्हाला बळी चढवत आहे , कृपा करुण त्याचा मानपान घ्या , आणि उरलेल्या नैवेद्याच भोग घ्यायची आम्हाला परवानगी द्या !" हा आवाज ? हा आवाज ! धवलच्या ओळखीचा होता ! का नाही असणार ?