ती शेवटची भेट

स्मशानभूमीत मी आज तिला शेवटचं पाहतो आहे.हातात माझा एक जुना फोटो अल्बम आहे… आणि समोर लाकडांवर ती शांतपणे झोपलेली — या विश्वात कायमची मिसळायला तयार.मी तिच्याच समोर, मूक अश्रूंनी डोळे भरलेले, त्या लाकडांच्या ढिगावर नजर लावून बसलो आहे...या सगळ्याची सुरुवात झाली होती २०१७ मध्ये.माझं ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण झालं होतं आणि त्याच वर्षी मला एका चांगल्या कंपनीत नोकरीही मिळाली.इथे आपल्याकडे सगळ्यांना माहितीच आहे — एकदा का मुलगा नोकरीला लागला की घरात लग्नाचं बघणं सुरू होतंच.तसंच काहीसं माझ्याबाबतीतही झालं.सहा महिने झाले असतील नोकरीला लागून. घरच्यांनी मुली बघायला सुरुवात केली.३-४ मुली बघितल्या, पण मनाला कुठलीच पटली नाही.तेव्हाच आमच्या एका पाहुण्यांनी एक नाव सुचवलं