बर्फाखालील मृत्यू

बर्फाखालील मृत्यू---अंधेरी पश्चिमेतील एक मध्यमवर्गीय इमारत. रविवारी पहाटे ६.४५.फोन आला –"मॅडम, एक मुलगी पंख्याला लटकलेली आहे… वाटतं आत्महत्या."पोलीस अधिकारी शिंदे मॅडम घटनास्थळी पोहोचल्या. खोली बंद नव्हती, आत प्रवेश करताच जो काही भेसूर दृष्य होतं, ते क्षणभर अंगावर काटा आणणारं होतं.मीरा कपूर, वय २४, मानसशास्त्र विषयात मास्टर्स करत होती. हुशार, स्वाभिमानी, सुंदर.आता मात्र ती पंख्याला लटकलेली होती.शिंदे मॅडमने एक मिनिट स्तब्ध पाहिलं. काहीतरी जुळत नव्हतं.खाली फक्त पाणी होतं. खुर्ची नाही, टेबल नाही. मीरा पंख्यापर्यंत पोचली तरी कशी?तेवढ्यात पायांच्या जवळ लांब गेलेल्या ओल्या खुणा त्यांनी पाहिल्या."कुठून आलं हे पाणी?"त्यांनी आपल्या खास गुप्तहेर मित्राला फोन केला –"Fazal Esaf. तूच हवा या केससाठी."---फझल एसाफ