कृतांत भाग २गौरी आश्चर्यचकित होत राजकडे पाहू लागली. तिच्या कल्पनेप्रमाणे एवड्या भाषा शिकलेला माणूस साठ एक वर्षाचा केस पिकलेला म्हातारा असावा पण समोर तर नुकतीच मिसरूड फुटलेला तिच्याच वयाचा तरूण होता.' मला वाटल कुणीतरी पत्रकार सांगाड्याच नेमक काय झाल त्याचा शोध घ्यायला आला असेल." गौरी म्हणाली." सांगाडे? कसले ?कुणाचे? म्हणजे मला सांगाड्यासोबत काम कराव लागणार?"राज घाबरून म्हणाला." किती घाबरट आहेस तू! खरच तू प्राचिन लिपी वाचतोस? मला शंका आहे." गौरी त्याला हिणवत म्हणाली." हे बघा मी माझ काम कस करायच ते तुम्ही सांगू नका.चला मला त्या वस्तू व लेख दाखवा."" आत्ता? ताबोडतोब? जरा विश्रांती घे."पण राज ऐकेना.अखेर गौरी त्याला घेवून