आई लहान कि मुलगी लहान

  • 255
  • 69

."आई लहान की मुलगी?" सौ तृप्ती देव काल एका मैत्रिणीच्या व्हाट्सअप स्टेटसवर नजर गेली. एक सुंदर फोटो – नवरा, बायको, आणि तीन वर्षांची गोड मुलगी. दोघींनी फ्रॉक घातले होते – गुडघ्याच्या थोडं वरचे. फोटोमध्ये सर्व काही हसतमुख, प्रसन्न. पण डोळ्यांत एक प्रश्न झिरपत राहिला – लहान कोण? आई की मुलगी?आता नवीनच युग आहे. आई हे एक “टायटल” आहे, वयाचा किंवा परिपक्वतेचा नाही. आई हे “लूक” आहे, इंस्टाग्रामवर फिल्टर लावून फिट बसवायचा! आणि या लूकला अनुसरून सगळे ड्रेसकोडही अपडेट होत आहेत.पूर्वी मुलगी फ्रॉक घालायची, आईने साडी किंवा सलवार-कुर्ता घालायचा. आज, आईही फ्रॉकमध्ये आणि मुलगीही. फरक इतकाच – आईचा ब्रँडेड, मुलीचा कार्टून प्रिंटेड. मुलगी