सकाळचे सहा वाजले होते......गणेश अजूनही गाढ झोपेत होता. तेवढ्यात त्याला अंगाला काहीतरी टोचल्यासारखे जाणवले.त्याने त्याकडे दुर्लक्ष करून स्वप्नात रंगणे सुरूच ठेवले."आईSSS!" एक जोरदार धपाटा त्याच्या पाठीवर पडला.....आणि तो चाचपडत उठला. त्याची आई सकाळची कामं आटपून त्याला शाळेसाठी उठवत होती. तो जरा नाराजीनेच उठला आणि आंघोळीला गेला, पण आज तो बऱ्याच दिवसांनी शाळेत जाणार असल्याने खूप आनंदात होता, कारण दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा मित्रमंडळी जमणार होती आणि नवीन उपक्रमांवर चर्चा होणार होती.राजेश, मोहन आणि गणेश हे बालपणीचे जिवलग मित्र होते. तिघेही यावर्षी आठवीत होते. राजेश हुशार होता, पण तसा भित्रा होता. त्याचा खंडोबा देवावर खूप विश्वास होता. मोहन हा टवाळखोर होता, घरातील